A few early reactions to घोस्ट रायटर आणि इतर विज्ञानकथा.

विज्ञानकथांचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत — हार्डकोअर आणि सॉफ्टकोअर…
…आशिष महाबळांच्या बहुतांश कथा हार्डकोअर प्रकारात मोडतात. मात्र त्यांनी लेमच्या मार्गानं न जाता हार्डकोअर आणि सॉफ्टकोअर यांचा समन्वय राखण्याचा प्रयत्न केला आहे…
…तोल जाऊ न देता ती त्यानं लीलया पार पाडली आहे. त्याबद्दल त्याचं अभिनंदन.
— Dr. Bal Phondke (excerpt)
विज्ञानकथांचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत. हार्डकोअर आणि सॉफ्टकोअर. पहिला प्रकार अधिक विज्ञानप्रचुर असतो. त्याचा टोकाचा प्रकार रशियन लेखक स्टॅनिस्लाव लेमच्या कथांमध्ये दिसून येतो. त्यात प्रस्थापित विज्ञानाचं सविस्तर विवेचन तर असतंच, पण त्याचं जे भविष्यातील प्रक्षेपण विज्ञानकथांमध्ये अभिप्रेत असतं, तेही असंच तपशीलवार वर्णन केलेलं असतं. इतर ललित कथांपेक्षा विज्ञानकथेच्या पूर्ण आस्वादासाठी वाचकाची विज्ञान आकलनाची किंवा विज्ञान साक्षरतेची जी किमान पातळी आवश्यक असते ती हार्डकोअर कथांमध्ये उच्च स्तरावर ठेवलेली असते. ती लेखक गृहीत धरतो. …
सॉफ्टकोअर कथेमध्येही प्रस्थापित विज्ञानाच्या अचूकतेला बाधा आणलेली नसते. त्याचं प्रक्षेपणही तर्कसंगतच असतं. त्याच बरोबर ती अधिक वाचकाभिमुख ठेवण्याचा कसोशीनं प्रयत्न केलेला असतो. वाचकाकडून ज्या विज्ञान आकलनाची अपेक्षा असते ती जवळजवळ किमान पातळीवर म्हणजे आजच्या मराठी वाचकांच्या संदर्भात सांगायचं तर साधारण दहावी पर्यंतच्या विज्ञान शिक्षणाच्या पातळीवर ठेवलेली असते. …
आशिष महाबळांच्या बहुतांश कथा हार्डकोअर प्रकारात मोडतात. मात्र त्यांनी लेमच्या मार्गानं न जाता हार्डकोअर आणि सॉफ्टकोअर यांचा समन्वय राखण्याचा प्रयत्न केला आहे. ही तारेवरची कसरत आहे. तोल जाऊ न देता ती त्यानं लीलया पार पाडली आहे. त्याबद्दल त्याचं अभिनंदन. …
डोक्याला खाद्य देणारे पुस्तक (alpana)
…मला हे पुस्तक वाचताना शाळेत असताना वाचलेल्या नारळीकरांच्या कथांची बर्याच वेळा आठवण येत होती…
…कथेच्या शेवटी किंवा मध्येच कधी काही संदर्भ लागतात… त्यावेळी अगदी wow moment येते…
…एकूण डोक्याला खाद्य देणारा असा आहे हा कथासंग्रह. मजा आली वाचताना.
— Amazon.in review (excerpt)
आवर्जून वाचावे असे पुस्तक
— Amazon.in review
Wonderful!
— Amazon.in review
More testimonials and references will be added here over time.

Prof. Jayant Narlikar reading Ghost Writer. (Photo credit: Prof. Ajit Kembhavi)